खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला बेड्या

खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला बेड्या

खुनाचा प्रयत्न करून वाहनांची तोडफोड करणारी दहशत माजवणारी टोळी १२ तासाचे आत बिबवेवाडी पोलीसांनी ताब्यात घेऊन गजाआड केली. ही घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती समोर आली आहे.

काकडे वस्ती येथे राहणारा अमिर खान तसेच शेळकेवस्तीत राहणारा सुरज कोळी आणि आकाश कोळी यांचे एप्रिल २०२१पासून पूर्ववैमनस्यावरून वाद सुरु होते. १३ डिसेंबर रोजी अमिर खानचा वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करत असताना शेळकेवस्तीतील सुरज कोळी आणि त्याचे साथिदार हे अमिर खानला मारण्यासाठी गेले. त्यावेळी अमिर खान व त्याचे मित्र तेथून पळून गेले.

त्यानंतर १३ डिसेंबर च्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अमिर खान हा त्याचे मित्र हत्यारे घेऊन सुरज कोळी व त्याच्या टीमला मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले पण घरे माहिती नसल्यामुळे त्यांनी वस्तीतील लोकांच्या ७ वाहनांची तोडफोड केली. या गाड्या कोयत्याने व तलवारीने फोडल्या काही गाडीच्याच्या पेट्रोल टाकीवर कोयते आणि तलवारीने मारून मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत माजवली. सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version