डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्यावर चाकूने वार

हिंगोलीत तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना घडली.
डोळ्यात मिरचीपूड टाकत तलाठ्यावर चाकूने वार

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रासाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. जखमी तलाठ्याला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आडगाव येथील तलाठी सज्जा कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. त्यांच्याकडे बोरी सावंत सज्जाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्या ठिकाणचा एकजण शेतीविषयक कामकाजासंदर्भात तिथे आला. या ठिकाणी दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली, त्याने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकले. ग्रामस्थांनी जखमी पवार यांना परभणी येथे उपचारासाठी हलविले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version