आटपाडीत रुग्णालयातच धर्मांतराचा प्रयत्न

आटपाडीत रुग्णालयातच धर्मांतराचा प्रयत्न

सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील एका रुग्णालयात रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून धर्मांतर करण्याचा प्रकार उघड झाला आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत चित्रीत झाला असून पोलिसांनी संजय गेळे आणि अश्विनी गेळे यांच्या विरोधात जादूटोणा आणि भोंदूगिरी केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

आटपाडी गावात अंधश्रद्धेच्या जोरावर धर्मांतर करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अशातच, आटपाडीतील वरद रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे बेकायदेशीर धर्मांतर करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. रुग्णालयात संबंधित महिला न्युमोनिया आजारने त्रस्त असून गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेत होती. त्यामुळे तीचे कुटुंबिय चिंतेत होते. यातूनच धर्मांतराचा प्रकार घडला असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार, धर्मांतराचे संबंधित छायाचित्र अतिदक्षता विभागातील असून रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून भोंदुगिरी सुरू असल्याचा प्रकार चित्रफीती स्पष्ट दिसत आहे. संबंधित प्रकाराला रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी रावण यांनी विरोध केला. मात्र, संजय गेळे आणि अश्विनी गेळे यांनी त्यांना न जुमानता त्यांनाच दमदाटी करत बेकायदेशीर धर्मांतर केले. त्यामुळे या दोन्ही आरोपींविरोधात कठोर कारवाई करत आटपाडीतीत सुरू असलेल्या धर्मांतराचा प्रकार रोखण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version