लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’

लाखो महिला वारकऱ्यांसाठी  ‘आरोग्य वारी’

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्यादेखील लक्षणीय असते. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून लाखो वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षी चालत असतात. आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली.

वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर महिलांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था असावी, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन आवश्यक, स्त्रीरोग तज्ज्ञाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, महिला सुरक्षितवेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी,मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन द्यावा, पालखी सोहळ्यासाठी निर्भया पथक तैनात करण्यात यावे आदि सूचना आयोगाने प्रशासनाला केल्या आहेत.

चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी व वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून लाखो वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षी चालत असतात. यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. २०-२१ दिवस महिला जवळपास दोनशे किमीचा पायी प्रवास करत असतात. यामुळे वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे.

याबाबत पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत सुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारक-यांसाठी 1,290 फिरती स्वच्छतागृहे व 12 शाळांमध्ये न्हाणीघराची व्यवस्था केली आहे. स्त्री रोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध असून 30 ठिकाणी निवारा कक्ष आहेत. सोलापुरात दर दीड कि.मी. अंतरावरील निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, 40 ठिकाणी हिरकणी कक्ष, 25 डॉक्टर पथक अशा सुविधाचे नियोजन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version