माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी कठोर कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख यांनी याआधीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी देशमुख यांची तातडीचा दिलासा देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली होती. मात्र आवश्यकता पडल्यास अनिल देशमुख कारवाईपासून दिलासा मिळवण्याच्या मागणीसाठी सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागू शकतात, असेही न्यायालायने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी पुन्हा कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेतली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.