‘बारामतीकर विजयी करतील’

बारामतीकर चांगले मताधिक्य देत विजयी करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.
‘बारामतीकर विजयी करतील’

बारामती : बारामतीकर चांगले मताधिक्य देत विजयी करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अजित पवार मागील मागील तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून बारामतीचे आमदार आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. यामुळे यंदा कोण जिंकणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. 

'बारामतीत तुतारी वाजेल'

बारामतीकर शरद पवारांना विसरणार नाहीत. तेवीस तारखेला बारामतीसह राज्यात तुतारी वाजेल असा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. तर युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी बारामतीत काहीही होऊ शकते, २३ तारखेला सगळे स्पष्ट होईल; अशी मोघम प्रतिक्रिया दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version