सध्या राज्यभरात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महानगपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलला भेट दिली. यादरम्यान पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, पुणे इनर रिंग रोड कधी सुरू होणार? तसेच पुणे शहरासाठी विकासाची पंचसुत्री अजित पवारांनी मांडली. यावेळी त्यांनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत रॅपीट फायर हा खेळ खेळला. यानिमित्त अजित पवारांच्या कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत आणि अजित पवारांसाठी काय खास याबद्दलची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा- Pune Election 2026: पुणे शहरासाठी अजित पवारांनी मांडली विकासाची पंचसुत्री; म्हणाले खड्डेमुक्त रस्ते ते हायटेक रुग्णालये…
अजित पवारांना देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की, “मी दोघांसोबतही उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आज त्यांच्यासोबत काम करतोय त्यामुळे मला एवढ समजल की दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे”. पुढे उद्धव ठाकरे की राज ठाकरे विचारण्यात आल्यावर अजित पवार म्हणाले की, “दोघे भाऊ एता एकत्र आलेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा…” जास्त जवळचं कोण? शरद पवार की सुप्रिया सुळे यावर अजित पवार म्हणाले की, “पहिल्यांदा मी जन्मला आलो तेव्हा काकांना पाहिलं आहे त्याच्यामुळे काका… आणि नंतर माझ्या जन्मानंतर सुप्रिया सुळे जन्माला आल्या त्यामुळे काकांच्या नंतर सुप्रिया सुळे…” राजकारणात तुमचा वारसा कोण चालवणार यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “ते मी आता काही सांगू शकणार नाही…” त्यानंतर केलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री पद की अर्थमंत्री खात कोण पद अजित पवारांना जास्त आवडत यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्री पद…”
हेही वाचा- Municipal Corporation Election: महाराष्ट्रात सभांचा पाऊस; फडणवीस, शिंदे, अजित पवार मैदानात, आजचा रविवार ठरणार निर्णायक
राज्यात राष्ट्रवादीला किती जागा मिळतील?
यावर अजित पवार म्हणाले की, “मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यातून मी 1991 ला पहिला खासदार ही झालोय. त्यावेळेस शरद पवार आणि राजीव गांधी यांनी मला अतिशय तरुण काळात संधी दिली होती. राजीव गांधी त्यावेळेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. आजपर्यंत 92, 97, 2002, 2007, 2012 आणि 2017 या सहा निवडणुका मी लढवल्या आहेत. सहा निवडणुकांमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेस कधीच हे एतके येतील, ते तितके येतील असं सांगता येत नाही. माझा उद्देश असतो आपण काम करत राहा. दिवस-रात्र काम करण, आपलं वातावरण निर्मिती करण, आपली भूमिका लोकांसमोर मांडण, आपली भूमिका व्यवहारिकरित्या लोकांपर्यंत मांडण, आपली भूमिका अभ्यासक असली पाहिजे ही माझी कामाची पद्धत आहे आणि ती मी करतो. त्यामुळे मी इतरांसारख आमचे सव्वाशे निवडून येणार आहेत, आमचे इतके निवडून येणार आहेत. मला मागे पिंपरी-चिंचवडमध्ये विचारलं ते म्हणतात सव्वाशे निवडून येणार आहेत, मी म्हटलं सव्वाशे निवडून येणार आहेत तर राहतील किती? तेवढे आमचे निवडून येतील. त्यामुळे असं काही नसत मतदार राजा हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.