यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिक संवाद मिळावा घेतला. उद्धव ठाकरेंचा हा मेळावा संपल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील उध्दवसेनेच्या 15 पदाधिकाऱ्याचे राजीनामे दिले आहेत. यावेळी यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामा दिला असून यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत त्यांनी फुटलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार प्रहार केला.
शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर 6 खासदारांच्या फुटीने ठाकरे गट आधीच ढासाळला होता. अशातच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच यवतमाळ तालुक्यातील तब्बल 15 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
यवतमाळचे तालुकाप्रमुख गजानन पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, महिला आघाडी प्रमुख अंजली गिरी, अक्षय ठाकरे तालुका प्रमुख युवासेना आधीचा यात समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे थेट जिल्हा संपर्क प्रमुखांकडे सुपूर्द केले. यावेळी वैयक्तिक कारणाने पद सोडत असल्याचे पत्रात नमूद केले असून संजय खासदार संजय देशमुख यांना समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या या सभेला हे 15 पदाधिकारी उपस्थित होते आणि आता त्यांनीच राजीनामा दिल्याने यवळमाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.