BJP Vs Ajit Pawar : "आम्हाला हलक्यात घेऊ नका" भाजपच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
BJP Vs Ajit Pawar : "आम्हाला हलक्यात घेऊ नका" भाजपच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

राज्यात बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा गोंधळ, निष्ठावंतांचे नाराजीनाट्य, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. शुक्रवारी पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत सत्ताधारी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून आता भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा- Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : "आम्ही मोठे भाव आहोत त्यामुळे…अजित पवारांना" त्या विधानावर बावनकुळेंच मोठं विधान
याचपार्श्वभूमिवर सांगलीतील प्रचार सभेत बोलताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, "ये घरला जायचयं का असं म्हणाऱ्यांना मी असं म्हणेन की, आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील आमच्याकडेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासमोर निवडणुकीचं एक धोरणं मांडलं. विकासावर निवडणूक न्यायची आहे, युतीतील पक्षांनी एकमेकांवर अजिबात टीका करायची नाही. तरी देखील टीका करायला सुरुवात झाली. किती दिवस चालणार आहे? कुठे थांबणार आहे? याचा अंदाज घेऊन ठरवू  मागच्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत टीका करणाऱ्यांनी म्हटलं होतं की तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, त्यानंतर मी भोरमधील एका सभेत म्हटलं होतं की तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे". असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यापुर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आता या विषयावरून राजकारण अधिक तापणार की कोणतं वळण घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version