Rohit Pawar On MHT-CET Exam Scam : तलाठी भरतीपासून MHT-CET पर्यंत मोठा घोळ? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; परीक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न

नीट पेपरफुटीनंतर देशातील इतर परीक्षेतील घोटाळ्याबाबत बोलण्यासाठी रोहित पवार यांनी MHT-CET परीक्षेतील घोळावर आज पत्रकार परिषद घेत CET परीक्षा घोटाळ्याबाबत मोठा दावा केला आहे.
Rohit Pawar On MHT-CET Exam Scam : तलाठी भरतीपासून MHT-CET पर्यंत मोठा घोळ? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; परीक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न

नीट पेपरफुटीनंतर देशातील इतर परीक्षेतील घोटाळ्याबाबत बोलण्यासाठी रोहित पवार यांनी MHT-CET परीक्षेतील घोळावर आज पत्रकार परिषद घेत CET परीक्षा घोटाळ्याबाबत मोठा दावा केला आहे. नीट पेपरनंतर आता सीईटी, जेईई परीक्षेच्या निकालातही गडबड होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांनी दोन्ही परीक्षा घेणार्‍या कंपन्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच परीक्षा टेंडरची देखील चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवारांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पुढे रोहित पवारांनी म्हटलं की, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. आज पैसे दिल्याशिवाय अशा परीक्षा पास होऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर यामुळे गंभीर संकट आले आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असून, न्यायासाठीचा लढा सुरूच ठेवणार आहोत.’ असा इशारा रोहित पवारांनी दिला. 

हेही वाचा- Harshwardhan Sapkal On Sunetra Pawar : “आम्ही वस्तुस्थिती सांगितली, आम्ही केलेली टीका…” सुनेत्रा पवारांवरील टीकेचं समर्थन करत सपकाळांचं मोठ वक्तव्य

पुढे त्यांनी म्हटलं की, “2020 ते 2026 या कालावधीतील आकडेवारी पाहिली असता, 2023 पूर्वी CET परीक्षेतील टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना 12वी (PCM) बोर्ड परीक्षेत 80% पेक्षा अधिक गुण मिळाले होते. 2020 मध्ये 98, 2021 मध्ये सर्व 100 आणि 2022 मध्ये 99 विद्यार्थी या निकषात बसत होते. मात्र, 2023 नंतर या पॅटर्नमध्ये अचानक घसरण दिसून आली. 2023 मध्ये ही संख्या 88 वर आली, 2024 मध्ये 63, 2025 मध्ये 66 आणि 2026 मध्ये तर ती थेट 43 वर घसरली.”

पुढे त्यांनी म्हटलं की, “एका घरातील जुळ्या भाऊ-बहिणीला CET परीक्षेत 99.99 पर्सेंटाइल मिळाले आहेत. मात्र, त्यांच्या 12वी (PCM) बोर्ड परीक्षेतील गुण पाहिले असता, भावाला केवळ 56.67% आणि बहिणीला फक्त 51% गुण मिळाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांचे वडील भाजपचे मंडळ अध्यक्ष आहेत. 12वी बोर्ड परीक्षेत अवघे 50 ते 55 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी CET मध्ये 99.99 पर्सेंटाइल कसे मिळवू शकतात? यामध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा आणि पेपरफुटीचा संशय असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.”

हेही वाचा- Raigad Guardian Minister : मोठी बातमी! रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यासाठी तटकरेंकडून ग्रीन सिग्नल; गोगावलेंचा मार्ग मोकळा?

CET सेलमधील कोट्यवधी रुपयांच्या टेंडर घोटाळ्याचा मोठा दावा
“CET सेलकडून सातत्याने निवडक कंपन्यांनाच कोट्यवधी रुपयांची मोठी कंत्राटे देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्याची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे. EduSpark ला CET परीक्षा 2021 साठी ₹90 कोटी, 2022 साठी ₹90 कोटी आणि CET CAP 2023 साठी ₹84 कोटी देण्यात आले. 2023 मध्ये ‘Learning & Testing Center’ उभारण्यासाठी Skilltree Consulting Pvt Ltd ला ₹120 कोटींचे टेंडर देण्यात आले. त्यानंतर CET CAP 2024 साठी EduSpark ला पुन्हा ₹90 कोटी, 2024 च्या LTC 2.0 प्रकल्पासाठी Indus Edu-Train Pvt Ltd ला ₹127 कोटी, तर CCTV देखरेखीच्या कामासाठी EduSpark International Pvt Ltd ला ₹40 कोटी देण्यात आले. 2025 मध्ये CET CAP प्रक्रियेसाठी EduSpark International Pvt Ltd ला ₹120 कोटी, तर 2026 मध्ये LTC Manpower Project साठी Skilltree Consulting Pvt Ltd ला ₹8 कोटींचे टेंडर मिळाले. 2021 ते 2025 या कालावधीत या कंपन्यांच्या कथित साटेलोट्याला CET परीक्षेसाठी ₹384 कोटी, तर LTC प्रकल्प आणि इतर कामांसह एकूण ₹680 कोटींची कंत्राटे देण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी”, अशी मागणी यावेळी रोहित पवार यांनी केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version