Siddhivinayak Trust : दरवर्षी 18 कोटींची चोरी! सिद्धिविनायक मंदिरावर गंभीर आरोप; आता ट्रस्टचं राज ठाकरेंना थेट उत्तर

Siddhivinayak Trust : दरवर्षी 18 कोटींची चोरी! सिद्धिविनायक मंदिरावर गंभीर आरोप; आता ट्रस्टचं राज ठाकरेंना थेट उत्तर

मुंबई : मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम मंदिरानंतर आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सविस्तर उत्तर दिले. सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत गैरसमजाने काही माहिती दिली. सिद्धिविनायक न्यासाच्या आमच्या काही ट्रस्टींनी सरकारला एक पत्र दिले होते. या पत्रात देणगीची चौकशी करा, अशी विनंती केली होती. या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमजाची भावना निर्माण झाली. सिद्धिविनायक न्यास गेली दोन वर्षे उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Shivsena Symbol Case : ‘पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, नाहीतर ते…’; शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य

सदा सरवणकर म्हणाले की…

राज ठाकरे यांनी आज सकाळी एका सभेत सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत माहिती दिली. त्यात ट्रस्ट कडून शासनाला पत्र दिलं गेलेलं त्याबद्दल बोलले. सिद्धिविनायक न्यास गेले 2 वर्ष उत्कृष्ट काम करत आहे. पत्रामध्ये चोरी असा उल्लेख नाही गेली. 2 वरर्ष दानपेटीत येणारी रक्कम 40 – 45 लाख होती आणि काही महिन्यापासून 90 – 98 लाख रक्कम आहे. ऑडिट केलं जाईल, त्याचं सत्य, कारण लोकांना कळलं पाहिजे. ट्रस्टी म्हणून माझी नियुक्ती झाली आणि उत्पन्न वाढावं, असं वाटलं. कर्मचारी कंत्राटी त्यांच्या माध्यमातून गुगल पेवरून दर्शनासाठी पैसे घेतले जात होते. हे सर्व लक्षात आल्यावर मी 19 कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं. त्यांच्याकडून नंतर शपथपत्र घेतलं. काही ठिकाणी कर्मचारी हातचलाखी करून पैसे काढतात हे कळलं. तेव्हा आम्ही कारवाई केली. 9 कर्मचाऱ्यांना पकडलं. भटजींना काही जण पैसे देतात, पण आपल्याला असलेल्या GR प्रमाणे भटजींना जर कोणी पैसे दिले. तर ते दानपेटीत टाकावं, हे केल्यावर लक्षात आलं की उत्पन्नाची वाढ वाढली. दोन वर्षांपूर्वी 40 – 45 लाख जमा होत असतील आणि आता 90 – 98 कसे येतात, हे शोधण्याची पद्धत होती. आपलेच कर्मचारी पैसे मोजण्यासाठी लावले तर तिकडे उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. पत्रात आम्हीही पाहिलं त्यात हीच मागणी होती की, ऑडिट होईल. तेव्हा वाढ का होतेय, याची चौकशी व्हावी. यासाठीचं ते पत्र होतं. राज ठाकरेंना जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा ते कौतुक करतील, असं वाटत. मी राज ठाकरेंना पत्र लिहिलं. सिद्धिविनायक इकडे काही नवीन सुशोभीकरण होतंय, त्यासाठी तुम्ही बघायला या. तक्रारीचा आधार घेऊन आम्ही सुधारणा केली. राज ठाकरे यांना आम्ही चांगले नेते म्हणून आदर करतो. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version