विधान परिषद निवडणुकांच्या धामधुमीत नाशिकमधून समोर आलेल्या निकालाकडे सर्वांच्या नजरा फिरल्या. भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे गोकुळ गीते यांचा नाशिक विधान परिषदेमध्ये विजयी झाले. नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भुईसपाट केले. यानंतर आता शिंदेंकडून मविआनंतर महायुतीतच सुत्रे हलवली जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामने यांना फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचे नाना गामने यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गोकुळ गीते यांना घेऊन या अशी मागणी देखील उदय सामंत यांनी केल्याचे नाना गामने यांनी सांगितले आहे. उदय सामंतांच्या या मागणीवर आम्हाला येताना ट्रॅफिक लागेल असं उत्तर नाना गामने यांच्याकडून देण्यात आल्यावर, थेट स्पेशल विमान पाठवून देतो असं उदय सामंत यांच्याकडून म्हणण्यात आले.
यावेळी नाना गामने यांनी म्हटडलं की, 1 वाजेपर्यंत ओझर विमानतळावर विमान येणार आहे. आम्ही मुंबईला जात आहोत. एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेणार आहोत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वेगळ्याच खेळीमुळे महायुतीत खळबळ उडाली असून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता गीते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा एकतर्फी विजय
नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान गोकुळ गीतेंच्या आघाडीने नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलली आहेत. नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भुईसपाट केलं आहे. गोकुळ गीतेंनी पहिल्या फेरीत 310 पैकी 389 मतांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत मिळालेल्या या एकतर्फी मतदानामुळे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.