Abdul Sattar Meets Devendra Fadnavis : "उद्या आम्ही आमचा फॉर्म मागे घेणार" मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार नमले

विधान परिषद निवडणुकीच्या पार्शाभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला होता. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या संभाजी नगर जालनाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता तो आता सुटला आहे.
Abdul Sattar Meets Devendra Fadnavis : "उद्या आम्ही आमचा फॉर्म मागे घेणार" मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार नमले

विधान परिषद निवडणुकीच्या पार्शाभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला होता. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या संभाजी नगर जालनाच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. सत्तारांचा मुलगा समीर सत्तार संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता मात्र महायुतीने या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिल्यानंतर सत्तार नाराज असल्याची चर्चा सुरु होती. तसेच गेल्या दोन दिवसांत सत्तार यांनी भाजपवर “शिवसेना संपवण्याचा प्रयत्न” केल्याचा आरोप करत महायुतीतील वाद उघडपणे मांडला होता.

या जागेवरून निर्माण झालेले महायुतीतील वाद आता मिटला आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर ‘जिल्ह्यामध्ये आम्हाला जो काही त्रास झाला तो यापुढे होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलं’, त्यामुळे आपण आपल्या मुलाचा अर्ज मागे घेणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आणि विधान परिषद निवडणुकीच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता, तो तणाव आता निव्वळला आहे.

हेही वाचा- Abdul Sattar: अब्दुल सत्तार अन् एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री 3 तास खलबतं; बंडखोरी शमणार? सत्तारांचा मोठा खुलासा

“आज मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिला होता, आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी जाणून घेतल्या. पुढचं राजकारण करताना महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा  अशा सूचना ते देणार आहेत. काल उपमुख्यमंत्री यांनाही आम्ही भेटलो त्यांच्याशी याबाबत आमचे चर्चा झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला जाईल यामध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत  जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयाने राहावं अशा सूचना मुख्यमंत्री देणार आहेत. उद्या आम्ही आमचा फॉर्म मागे घेणार आहोत. मुख्यमंत्री हे महायुतीचे आहेत त्यांना आमच्या अडीअडचणी आम्ही सांगितले आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याबाबत सर्वांसोबत ते चर्चा करतील.” 

“सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहोत आणि अकरा वाजता मुलाचे उमेदवारी मागे घेणार. माझ्या मतदारसंघात कोणावरही वाद विवाद होणार नाही यासाठी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मी मागे घेणार आहे. कोणतेही आश्वासन कोणताही शब्द मी मुख्यमंत्र्यांकडून याच्यासाठी घेतलेला नाही. खालच्या पातळीवर आम्हाला होणारा त्रास पुढे होणार नाही याची दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेतली. आम्ही आमदार आणि एक खासदार एकत्र राहो असेच आदेश उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहेत. माझी जी नाराजी होते  त्याबाबत मार्ग काढण्याचा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिला आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत वक्तव्य मी केलेलं नाही अंबादास दानवे यांनी केलं होतं, पण शिवसेना एकत्रित करण्याचा अधिकार माझा नाही हे एकनाथ शिंदे याबाबत बोलू शकतील.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version