कोलकाता विमानतळावर बुधवारी (दि.१५ जून) रात्री ९ च्या सुमारास प्रवाशांची वर्दळ होती. प्रवाशांची लगबग सुरु होती. काही प्रवाशी विदेशात जाण्यासाठी निघाले होते. तर काही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी निघाले होते. काहीजण विमान प्रवास करुन विमानतळावर दाखल झाले होते. ते आपापल्या घरी किंवा त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये जात होते. पण अचानक विमानतळावर आगीचा भडका उडला आणि एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने प्रवाशांची तारांबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. प्रवाशांची प्रचंड पळापळ सुरु झाली. त्यामुळे विमानतळावर भीतीवहा वातावरण निर्माण झाले. अखेर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सीआयएसएफ जवानांनी तातडीने विमानतळ परिसर पूर्णपणे रिकामा करून घेतला. आग लागल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास तीन गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.