सांगली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या 1980 च्या दशकातील ‘रेट्रो’फोटोंचा नवा व्हिज्युअल ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. जयंतराव पाटील यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून 80 दशकातील असे फोटो अपलोड केले आहेत. जे यापूर्वी कोणीही पाहिले नाही. त्यासोबतच जयंतराव पाटील यांनी Retro म्हणताय? आम्ही तर OG आहोत! असं कॅप्शन देत युवा पिढी सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जयंतराव पाटील यांच्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी, शरद पवार, अजितदादा, आर आर आबा, दिलीप वळसे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सोबतचे जुने फोटो पहायला मिळत आहेत.
या ट्रेंडची इतर राजकीय नेत्यांनाही भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नेतेमंडळींनी या 80 च्या दशकातील आपल्या लूकचा फोटो सोशल मीडिया माध्यमातून शेअर केला आहे. यामध्ये राम शिंदे, रितू तावडे, महेश लांडगे, पियुष गोयल आदी नेत्यांचा समावेश आहे.
काळ बदलतो… माध्यमं बदलतात… राजकारणाची भाषा बदलते…
पण लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची मूल्यं बदलत नाहीत.#ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ #ramshinde #80s pic.twitter.com/jQ9DF2nV8M — Ram Shinde प्रा राम शिंदे (@Prof_RamShinde) September 9, 2026
तंत्रज्ञानाची कमाल.. 80's चा हा ट्रेंड धमाल..! काळासोबत बदलणं गरजेचं आहे; पण बदल स्वीकारताना आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरांचं महात्म्य जपणं त्याहूनही महत्त्वाचं. Ai च्या माध्यमातून सध्या सोशल मीडियात सुरु असलेला 80’s च्या या ट्रेंडमधून जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय, हे… pic.twitter.com/fitmLiqiK9 — Mahesh Landge (@maheshklandge) September 9, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.