पुण्यातील अपघातात मुलीचा जागीच मृत्यू

पुण्यातील अपघातात मुलीचा जागीच मृत्यू

कधी खराब रस्ते तर कधी वाहनचालकांचा भरधाव वेग हे अपघटनासाठी कारणीभूत ठरत असतात. सध्या अपघातांचे प्रमाण वाढत चालेल आहे. त्यातच पुण्यातील मुठानदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मंगळवारी (दि. ६ जून) रात्री ९ च्या सुमारास पुण्यातील बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील मुठा नदीच्या पुलावर अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नऊ वाजून ५० मिनिटांनी घडली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. ऋतुजा दिलीप वायकर (वय- 23, रा.नऱ्हे आंबेगाव) असे या तरुणीचे नाव आहे. ती बावधन येथून महामार्गावरून घरी निघाली होती. अशी माहिती वारजे पोलिस पोलिसांकडून लावला जात आहे. तर, अद्याप या अपघाताची माहिती मिळालेली नसल्यामुळे अपघात कसा घडला याचा तपास केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version