Eknath Shinde : शिंदे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट रेशन कार्ड; नातू, सून अन् मुलाचं नावही सेम टू सेम

Eknath Shinde : शिंदे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट रेशन कार्ड; नातू, सून अन् मुलाचं नावही सेम टू सेम

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला होता. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, हे रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: 50 लाखांच्या व्यवहारातून थरार! आधी खणला खड्डा, मग प्राध्यापकावर त्यांच्याच पिस्तुलातून…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version