मुंबई , ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेची चर्चा जगभरात सुसाट रंगताना दिसत आहे. यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा ही मुंबई मध्ये पार पडत असून या फिनालेकडे संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित होताना दिसून येतंय . या फिनाले ची चर्चा रंगत असता हे ही बघायला मिळते की याच स्पर्धेतील एक उत्कृष्ट स्पर्धक सर्वाधिक चर्चेत असून नेटिझन्स तिला पाठिंबा सुद्धा देत आहेत. ती स्पर्धक म्हणजे सिनी शेट्टी. ही स्पर्धक मुंबईची आहे. सिनी शेट्टीचा जन्म 2 आॅगस्ट 2001 मध्ये मुंबईमध्ये झाला आहे .सिनी शेट्टीचे शिक्षण हे घाटकोपरमध्ये झाले असून तिने शालेय शिक्षण डॉमिनिक सॅव्हियो स्कूलमध्ये घेतले होते .मुंबईच्या एसके सोमय्या कॉलेजमधून तिने पदवी घेतली. ह्या शिक्षणाबरोबर तिने मॉडेलिंगची आवड जपून मेहनत करून मिस वर्ल्डच्या फायनल फेरी पर्यंत पोहोचून तिची जिद्द तिनं दाखवून दिली आहे.
सिनी शेट्टीचे सोशल मीडियावर 400 हजार फॉलोअर्स आहेत. हेच नाही तर सिनी शेट्टी हिला मिस वर्ल्ड 2024 च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. दरम्यान , मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज मिस वर्ल्ड स्पर्धेचा फिनाले पार पडत असून या फिनालेकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत कारण भारतीय लोक हे सिनी शेट्टी हिला सपोर्ट करताना दिसत आहेत तर मिस वर्ल्ड नक्की सिनी शेट्टी होणार की आणखी कोणी ? या चर्चेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे .
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.