गोव्यात ‘५२वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’

गोव्यात ‘५२वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’

  शनिवारपासून गोव्यात सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. आजपासून पुढील ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रथमच सहभागी होत आहे. येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे.

  बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसन्न जोशी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कारने सन्मानित केले जाणार आहे. तसेच यावेळी हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान स्झाबो आणि मार्टिन स्कोर्से यांना या महोत्सवात सत्यजित रे लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

  गोव्यात साजरा होणारा चित्रपट महोत्सव हा ५२वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. तसेय या महोत्सवात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रथमच सहभागी होणार आहेत. नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, प्राईम, झी ५, वूट आणि सोनी लाईव यासारख्या मोठमोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मना आमंत्रित करण्यात आले आहे.

  दरवर्षी या चित्रपट महोत्सवात जगभरातील सर्वोत्कृष्ठ चित्रपट दाखविले जातात. गोवा राज्यसरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version