भाऊ कदम यांच्या 50 व्या वाढदिवसाचं ‘असं’ धमाकेदार सेलिब्रेशन!

भाऊ कदम यांच्या 50 व्या वाढदिवसाचं ‘असं’ धमाकेदार सेलिब्रेशन!

प्रख्यात विनोदी अभिनेता भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम यांनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. आत्तापर्यंत अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. भाऊ कदम यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येलाच मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी भाऊ कदम यांचा वाढदिवस धुडधडाक्यात साजरा केला.

ढोलताशे वाजवत मित्रमंडळींनी भाऊ कदम यांना शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शनक रवी जाधव, राजेश देशपांडे यांसह कलाक्षेत्रातील मित्रांनी भाऊ कदम यांचा वाढदिवस साजरा केला. आपल्या तीन मुली, 1 मुलगा, पत्नी आणि आई या कुटुंबियांसोबत भाऊ कदम यांनी सोमवारी आपल्या 50 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.

एकेकाळी पानपट्टीवर काम करणारे भाऊ कदम यांनी 1991 साली नाटकाद्वारे कलाक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही ते झळकले. ‘फू बाई फू’ आणि सध्याच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version