मराठा आरक्षणावर महायुतीत रणकंदन

मराठा आरक्षणावर महायुतीत रणकंदन

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणावरून महायुतीत रणकंदन माजले आहे. सरसकट मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. आंदोलनाच्या वेळी ठरवून हिंसा करणाऱ्या आणि विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करून हिंसा करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या या भूमिकेला भाजपाकडून समर्थन मिळत आहे. ठरवून हिंसा करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल ओबीसींना दहशत निर्माण करावी लागेल, असेही वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया समजलेली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी विरोध सुरू केला आहे. मराठा – ओबीसी संघर्षाचे कारण ठरेल अशी वक्तव्ये करण्यापेक्षा भुजबळांनी त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडावे, असे शिवसेना मंत्री म्हणत आहेत. दुसरीकडे ‘भुजबळांच्या नातेवाईकांनी स्वतःच फोडलं स्वतःचं दुकान’ असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे – पाटील यांच्या या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया समजलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version