राहुल नार्वेकरांचा ऑन इमेल हॅक

राहुल नार्वेकरांचा ऑन इमेल हॅक

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मेल आयडीवरून राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवण्यास आले. याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आज सकाळी यासंदर्भातील माहिती समजल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कार्यालयात जाऊन या प्रकरणातील अधिक माहिती घेणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ऑन मेल आयडीवरून राज्यपालांना  आमदार सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मेलद्वारे करण्यात आली. राज्यपालांनी याबाबत विचारणी केली असता आपल्याला याबद्दलची माहिती नसल्याचे नार्वेकरांनी सांगितले. या प्रकरणात ताबडतोब लक्ष घालून त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version