मनोहर जोशींची प्राणज्योत मालवली

मनोहर जोशींची प्राणज्योत मालवली

प्रतिनिधी, मुंबई, दि.२३ फेब्रुवारी २०२४ : लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी (दि. २३ फेवरूवरी २०२४) सकाळी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version