अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नेवार्क येथील एका हिंदू मंदिराला खलिस्तानी कट्टरवाद्यांनी लक्ष्य केले आहे. येथे काही लोकांनी मंदिराची तोडफोड केली आणि मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या. कॅलिफोर्निया पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलिस्तानवाद्यांनी ज्या मंदिरावर हल्ला केला ते मंदिर वॉशिंग्टन डीसीपासून १०० किमी अंतरावर आहे. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मंदिराच्या भिंतीवर भिंद्रनवाले यांचे शहीद असे वर्णन करण्यात आले होते.

कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिराची तोडफोड करून भारतविरोधी भित्तिचित्रे काढण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली. कॅलिफोर्नियातील नेवार्क शहरातील स्वामिनारायण मंदिराची शुक्रवारी साधारणपणे काल सकाळी साडेआठच्या सुमारास तोडफोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version