शीजानची कारागृहातून सुटका

शीजानची कारागृहातून सुटका

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीजान खानला आज ५ मार्च २०२३ रोजी तुरुंगातुन सोडण्यात आले. शिझान गेल्या ७० दिवसांपासून तुरुंगात होता. २४ डिसेंबर रोजी नायगावमध्ये ‘अलिबाबा:दास्तान-ए-काबुल’च्या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली.तिचा बॉयफ्रेंड शीझान खानवर टुनिषाच्या परिवाराने आरोप केले होते. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता.

शीझान खानला १ लाख रुपये भरुन वसई कोर्टानं हा जामीन मंजूर केला आहे. पण जामीन मिळाला असला तरी शीझान खानला आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे. याशिवाय पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. शिझानच्या वकिलांनी २० फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला २५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

‘अलिबाबा:दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत शीझान आणि टुनिषा प्रमुख भूमिकेत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, आत्महत्येच्या १५ दिवसांपूर्वी शीझानने टुनिषासोबत ब्रेकअप केले होते. अभिनेत्रीच्या आईने दावा केला आहे की शीझानने टुनिषाची फसवणूक केली होती, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. अनेकवेळा तिला पॅनिक अटॅकही आला होता. परंतु, शीझानने ब्रेकअप केल्याचे कबुल केले असून धोका दिल्याचा आरोप धुडकावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version