MSRTC News : कामात हलगर्जीपणा महागात पडला! एसटी महामंडळाकडून तब्बल 11 अधिकाऱ्यांचे निलंबन; संपूर्ण विभागात खळबळ

नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाई करण्याचे आदे दिले आहे. अशातच एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  
MSRTC News : कामात हलगर्जीपणा महागात पडला! एसटी महामंडळाकडून तब्बल 11 अधिकाऱ्यांचे निलंबन; संपूर्ण विभागात खळबळ

एस टी महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाच्या प्रवासी भाड्यात वाढ होऊनही गेले दोन सिझन प्रवासी उत्पन्न कमी होत चालले आहे. नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाई करण्याचे आदे दिले आहे. अशातच एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  यात क्लास वनचे 3 आणि क्लास टूच्या आठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कामात हलगर्जीपणा आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रमुख अधिकारी निलंबित करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी दोन डेपो मॅनेजरसह नऊ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दहा जून रोजी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांच्या समितीकडून इन्स्पेक्शन करण्यात आले होते.   

हेही वाचा- Satara News : सातारा जिल्ह्यात बनावट खत आणि कीटकनाशकांचा मोठा साठा; पोलिसांच्या छाप्यात 99 हजार 450 किलोंचा माल जप्त

माहिती तंत्रज्ञानचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी या दोन सदस्यांच्या समितीने हे इन्स्पेक्शन केले होते. इन्स्पेक्शन दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळल्याने नाशिक विभागातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असणाऱ्या 11 अधिकाऱ्यांचे निलंबन केले. यावेळी महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून आलेली निलंबनाची ऑर्डर न  स्वीकारल्यास पोस्टाद्वारे पाठवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याने कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version