Govinda : ‘चित्रपटात रोमॅंटिक सीन शूट करताना…’; गोविंदा यांनी सांगितला मजेशीर किस्सा

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्यांच्या उत्कृष्ट विनोदशैली आणि अभिनयासाठी ओळखले जातात. 1986 साली प्रदर्शित झालेल्या 'इल्झाम' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे
Govinda : ''चित्रपटात रोमॅंटिक सीन शूट करताना...''; गोविंदा यांनी सांगितला मजेशीर किस्सा
1 / 6
पण तुम्हाला माहीत आहे का, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर गोविंदा अभिनेत्रीसोबत रोमॅंटिक सीन करताना खूप घाबरत होते? याबद्दल त्यांनी ''फ्राय-डे'' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचदरम्यान एक मजेशीर किस्सा सांगितला
2 / 6
गोविंदा म्हणाले, “करिअरच्या सुरुवातीला जेव्हा एखादी अभिनेत्री मला स्पर्श करायची, तेव्हा मी थरथर कापायचो. मला खूप भीती वाटायची”
3 / 6
ते पुढे म्हणाले, “माझ्या पहिल्याच ‘इल्झाम’ चित्रपटात एक डान्स सीन होता, जिथे समुद्रकिनाऱ्यावर स्लो मोशनमध्ये धावत माझ्या सह-कलाकार नीलमसोबत जवळीक साधायची होती, पण मी खूप घाबरलो होतो”
4 / 6
त्यावेळी आमच्या कोरिओग्राफर सरोज खान यांना माझी भीती जाणवली. त्यांनी मला विचारलं, “तुझी कधी गर्लफ्रेंड होती का?” मी नाही म्हणालो. तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, “मी तुला शिकवते मोठ्या पडद्यावर रोमान्स कसा करायचा”
5 / 6
गोविंदा यांनी पुढे सांगितले की, त्या घटनेनंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते अभिनयात अधिक मोकळेपणाने वावरू लागले
6 / 6
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version