ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्बंध

देशात ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तसेच मुंबईतही ओमायक्रॉन रुग्ण आढळत आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाताळ सणासह इतर कार्यक्रम करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.

गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मुंबईत विशेष दक्षता बालगली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नाताळ आणि नववर्ष साजरा करणार असाल तर प्रशासनाने काही अटी आणि निर्बंध घातले आहेत. तुम्ही मोकळ्या जागी पार्टी करणार असाल तर २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच जर तुम्ही घरातच मित्रमंडळींना बोलवून नववर्ष साजरा करणार असाल तर घराच्या एकूण क्षमतेपेक्षा ५० टक्के क्षमतेची उपस्थिती बंधनकारक आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून नववर्षाची पार्टीबाबत आखून दिलेल्या आणि पाहुण्यांना पार्टीला बोलवण्यासंदर्भात नियम ठरवले आहेत. गर्दी टाळा, कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.

मुंबईत काय आहेत निर्बंध?

  • लग्न, इतर समारंभांमध्ये उपस्थितीची मर्यादा काटेकोरपणे पाळणे बंधनकारक
  • बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्केच उपस्थिती अनिवार्य
  • खुल्या जागेत क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थितीला परवानगी
  • एक हजारांपेक्षा अधिक उपस्थितीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक
  • हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स या ठिकाणी नियमांचे योग्य पालन आवश्यक
  • नाताळ, नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळण्याचे निर्देश
  • मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घेण्याचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version