उद्धव गट आणि शिंदे गट यांपैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार या मुद्द्यावर मंगळवार १७ जानेवरी, २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती, पण आता ही सुनावणी शुक्रवार २० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
दरम्यान मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आप – आपली बाजू मांडताना बचावासाठी उद्धव गटाने पक्षघटनेचा आधार घेतला. ‘संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्या, अशी मागणीही उद्धव गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
‘पक्ष फूट ही निव्वळ कल्पना आहे, शिंदे गट म्हणजे वास्तव नाही’, असा युक्तिवाद उद्धव गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. ‘शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत असा आरोप करून शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता तपासा अशी विनंतीही, उद्धव गटाने केली आहे. तसेच, ‘निकाल द्यायची घाई कशाला ?’, असा सवालही उद्धव गटाने निवडणूक आयोगाला केला आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.