अनंत – राधिकाचं लग्न, वाहतूक मार्गात बदल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा विवाह १२ जुलै रोजी होणार आहे.
अनंत – राधिकाचं लग्न, वाहतूक मार्गात बदल

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा विवाह १२ जुलै रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी येणार असलेले मान्यवर आणि या मान्यवरांची झलक बघण्यासाठी होणारी गर्दी या शक्यतांचा विचार वाहतूक पोलिसांनी मुंबईच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल केला आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १२ जुलै दुपारी एक वाजल्यापासून सोमवार १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत वांद्रे – कुर्ला संकुलात अर्थात बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असतील. 

१. लक्ष्मी टॉवर जंक्शन – धीरुभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन ३ – इंडियन ऑइल पेट्रोल पंप – डायमंड जंक्शन – हॉटेल ट्रायडेंटकडून कुर्ला एमटीएनएलकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी. लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या वाहनांनाच येथे परवानगी.

२. पर्याय म्हणून वन बीकेसीकडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन, डायमंड गेट क्रमांक ८, नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळू शकतात. डायमंड जंक्शनपासून उजवीकडे वळून धीरुभाई अंबानी चौकातून बीकेसीकडे जाता येईल.

३. कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून धीरुभाई अंबानी चौकातील बीकेसी कनेक्टरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी. या भागात लग्नासाठी आमंत्रित केलेल्या लोकांचीच वाहने प्रवेश करू शकतील.

४. पर्याय म्हणून, कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून येणारे वाहनचालक नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळून डायमंड गेट क्रमांक ८ मधून पुढे जातील. हे लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून उजवीकडे वळून पुढे जातील. 

५. भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क्स, गोदरेज येथून येणारी वाहतूक जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक २३ वर प्रतिबंधित असणार आहे. येथून वाहतूक यूएस कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाईल.

६. अमेरिकन कॉन्सुलेट, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी कनेक्टरकडे जाताना एमटीएनएल जंक्शनकडून येणारी वाहतूक सन टेक बिल्डिंग येथे थांबवण्यात आली आहे.

७. अंबानी चौक ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंतचा लतिका रस्ता वाहतुकीसाठी एकेरी

८. कौटिल्य भवन ते अमेरिकन कॉन्सुलेटपर्यंत अॅव्हेन्यू ३ रोडवर एकेरी वाहतूक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version