Thane Water Cut: ठाण्यात पाणीबाणी कायम! अनेक भागांत 48 तास पाणीपुरवठा राहणार बंद

घरगुती वापरासह व्यावसायिक कामांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Thane Water Cut: ठाण्यात पाणीबाणी कायम! अनेक भागांत 48 तास पाणीपुरवठा राहणार  बंद

ठाणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून शहरातील काही भागांमध्ये तब्बल 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा यंत्रणेतील आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरगुती वापरासह व्यावसायिक कामांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही भागात कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. ठाणेकरांनी या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; आता कोणत्याही दुकानातून खरेदी करा धान्य

या 48 तासांच्या पाणीपुरवठा बंदचा परिणाम ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध भागांवर होणार आहे. यामध्ये दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 मधील काही भाग वगळता), कळवा प्रभाग समितीतील सर्व परिसर तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव या भागांचा समावेश आहे.

या सर्व परिसरांमध्ये तब्बल 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version