Sweets Price Hike Marathi News: सणासुदीला सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळणार, मिठाईच्या किमतींत मोठी दरवाढ

सध्या राज्यात अनेक सण-समारंभाची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान प्रसाद, मिठाई, नैवेद्य मोठ्या प्रमाणात बनवला जातो व खरेदी सुद्धा केला जातो. परंतु आता
Sweets Price Hike Marathi News: सणासुदीला सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळणार, मिठाईच्या किमतींत मोठी दरवाढ

 

सध्या राज्यात अनेक सण-समारंभाची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान प्रसाद, मिठाई, नैवेद्य मोठ्या प्रमाणात बनवला जातो व खरेदी सुद्धा केला जातो. परंतु आता सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन सणासुदीत कात्री बसणार आहे. सणासुदीच्या दिवसात मिठाई महागली आहे. मिठाईच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कारण दूध, तूप, साखर, बेसन, काजू, बदाम ,पिस्त्यांसह सुका मेवा यासर्वांचे दर वाढले आहेत. याबरोबरच इंधन, वाहतूक, कामगारांची मजदूरी, पॅकिंग साहित्य यांची सुद्धा किंमत वाढलेलली आहे. त्यामुळे या सर्वांचा परिणाम मिठाईवर होत आहे.

हेही वाचा – ऐन सणासुदीत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! मिठाईवर आता फक्त शुद्ध चांदीचा वर्क, नेमकं काय म्हणाले?

सर्वसामान्यांना या महागाईचा सामना करत सण-समारंभ साजरे करावे लागणार आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असून दरवाढ कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version