मुख्यमंत्र्यांनी माहिती लपवल्याचा आरोप, सुप्रीम कोर्टाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी माहिती लपवल्याचा आरोप, सुप्रीम कोर्टाची नोटीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवून मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यास बजावलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. यामधील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा फसवणुकीचा आहे.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. वकील सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली.

देवेंद्र फडणवीस यांनी खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप सतीश उके यांनी केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती रद्द करण्याची मागणी सतीश उके यांनी आपल्या याचिकेद्वारे केली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version