संजय राऊतांच्या स्वागतासाठी शक्तीप्रदर्शन

संजय राऊतांच्या स्वागतासाठी शक्तीप्रदर्शन

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेकडून राऊतांच्या आगमनासाठी ढोल-ताशा पथक ४० बस अशी जय्यत तयारी करून शिवसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

ईडीने संजय राऊतांच्या मालमत्तांवर टाच आणली. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपावर टीका केली. दिल्लीहून मुंबईत येताच संजय राऊतांनी भाजपला आव्हान दिले आहे. राष्ट्रभक्तीच्या नावावर किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

शक्तिप्रदर्शनानंतर राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा

शक्तिप्रदर्शनानंतर संजय राऊत मुंबई विमानतळावरून थेट वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यास गेले. राऊतांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठाकरे आणि राऊत यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत संपली असून जुलैमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत संजय राऊत आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version