दहावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार आहे.
दहावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार आहे. दहावीचा निकाल सोमवार २७ मे रोजी जाहीर होऊ शकतो, असे राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यात दहावीच्या परीक्षेला यंदा सोळा लाख नऊ हजार ४४४ विद्यार्थी बसले. परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. निकाल ऑनलाईन जाहीर झाला तरी अधिकृत गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षण संस्थेकडे संपर्क साधावा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version