नितेश राणेंना निलंबित करण्याची शिवसेना नेत्यांची मागणी

नितेश राणेंना निलंबित करण्याची शिवसेना नेत्यांची मागणी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेच्या पायऱ्यांवरून जाताना भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याऊ-म्याऊ करत त्यांना डिवचलं होतं. याप्रकरणी आज विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुद्दा उखडून काढला. याप्रकरणी नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना नेते भास्कर जाधव आणि सुहास कांदे यांनी केली आहे.

भास्कर जाधव म्हणाले, भाजप आमदार नितेश राणे यांनी माझा अपमान केला आहे. नेत्यांचा वारंवार अपमान होत असल्याचेही ते म्हणाले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो, तेव्हा मी त्यांची माफी मागितली होती. त्यामुळे नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भास्कर जाधव यांनी विधानभवनाच्या सभागृहात जुने प्रकरण उकरून काढले असून, मी योग्य संधीची वाट पहात होतो, असे ते म्हणाले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले.

काय होतं प्रकरण?

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात येताच, आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजप नेते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version