नांदेडमधील शंकर नगर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा नांदेडच्या शाळेत घडलेला लैंगिक शोषणाची आणखी एक घटना समोर आली आहे.
नांदेडमधील प्रबोधन प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने अवघ्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवून अश्लील वर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
स्वप्नील शृंगारे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे.
पालकांना या गोष्टीची माहिती कळल्यावर त्यांनी थेट शाळेलाच कुलूट ठोकलं आणि विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत आरोपीला अटक केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.