Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुलं बेपत्ता होण्याच्या प्रमाणात 30 टक्के वाढ; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारला खडेबोल, विरोधकांनाही सुनावलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे.
Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुलं बेपत्ता होण्याच्या प्रमाणात 30 टक्के वाढ; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारला खडेबोल, विरोधकांनाही सुनावलं

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं असल्याच्या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30 टक्क्यांनी वाढलं असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी या पत्रात नमूद केली आहे.

हेही वाचा : Mumbai Girl Missing Case : भयंकर! मायानगरी मुंबईत बेपत्ता मुलींचे 1,187 गुन्हे दाखल; 10 महिन्यांचा धक्कादायक आकडा समोर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version