महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांना सलग तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई : हवामान विभागाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांना सलग तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन पूर संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर,  ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version