BMC Officers Transfer : आयुक्तांच्या आदेशानंतर BMC तील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; अभियंत्यांना दिली अतिरिक्त जबाबदारी, नावे जाहीर

मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशाने अनेक सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत.
BMC Officers Transfer : आयुक्तांच्या आदेशानंतर BMC तील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; अभियंत्यांना दिली अतिरिक्त जबाबदारी, नावे जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशाने अनेक सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत. यानुसार सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांना हंगामी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर अलका ससाणे यांची ‘सी’ प्रभागातून एम/पूर्व प्रभागात बदली करण्यात आली आहे. गजानन बेल्लाळे यांच्याकडे मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून उज्वला इंगोले यांच्याकडे ‘ए’ प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. योगिता कोल्हे यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन (पूर्व उपनगरे) अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून स्वप्नजा क्षीरसागर यांच्याकडे कर निर्धारक व संकलक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. 

हेही वाचा : Marathi Language Controversy: ‘मराठी बोलणार नाही’ म्हणत भाषेचा अपमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेने शिकवला धडा; व्हिडीओ व्हायरल

तसेच कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्याकडे ‘सी’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त (पूर्णकालिक) तसेच सहाय्यक आयुक्त (बाजार) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच कार्यकारी अभियंता वनिता कोकाटे यांच्याकडे के/दक्षिण प्रभागाचे सहाय्यक आयुक्त (पूर्णकालिक) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता जयदीप मोरे यांच्याकडे ‘एन’ (घाटकोपर) प्रभागाचे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. या बदल्यांमुळे संबंधित प्रभागांतील पावसाळी कामे, नागरी सुविधा आणि विकासकामांच्या समन्वयावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version