Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव BMWचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; समोर आलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

मुंबईतील कोस्टल रोडवर आज पहाटे भरधाव बीएमडब्लू कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भरधाव BMWचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; समोर आलेल्या प्रकाराने सर्वच हादरले

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर आज पहाटे भरधाव बीएमडब्लू कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 5 वाजून 20 मिनिटांनी लोटस जेट्टीजवळ, लाला कॉलेजसमोर हा अपघात झाला हा भीषण अपघात झाला आहे. बीएमडब्लू कार ही मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती. भरधाव वेगामुळे चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील चारही जखमींना तातडीने उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.

Crime : मोठा मुलगा दुसऱ्या खोलीत, बाहेर आई-बाबा अन् बहिणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपासात सून…; परिसरात खळबळ

नायर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 21 वर्षीय आणि 17 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. तर 20 वर्षीय तरुणावर सध्या नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार  सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु
दरम्यान, या अपघाताची नोंद करण्यात आलेली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरु केला आहे. कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, या गोष्टीचा तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी वाजता अपघाताचा कॉल मिळाला होता.  काळ्या रंगाची BMW मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती. या गाडीत चार तरुण होते. यातील तीन जणांचा मृत्यू, तर 23 वर्षीय आदित्य ओसवाल जखमी झाला आहे. मृतांमध्ये धैर्य दर्शनशेठ (17), आदित्य (19) आणि शनय (21) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे अहमदाबादचे असून शिक्षणासाठी मुंबईत राहत होते. वेग आणि तेथे येण्याचे कारण ताडदेव पोलिस तपासत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version