विरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा

विरारमध्ये आयसीआयसीआय बॅंकेत दरोडा

विरार: विरार पूर्व भागामध्ये सशस्त्र हल्ला करत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला. विरार पूर्व स्टेशन परिसरातील बँकेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली घटना घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले. एका चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शाखेत घुसून महिला मॅनेजर योगिता चौधरी, कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्या गळ्यावर चाकू ठेवून लॉकरमधील सोने काढून चोरी करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मॅनेजर चौधरी यांनी विरोध केल्यावर त्यांची चाकूने हत्या केली, तर कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पैशाची पिशवी घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version