मुंबईतील आझाद मैदानावर रविवारी दिनांक २९ जानेवारी, २०२३ रोजी लिंगायत समाजाने महामोर्चा काढला आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. लेखी आश्वासनाशिवाय मैदान सोडणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला आहे.
लिंगायत समाजाच्या मागण्या –
१. लिंगायत समाजाला धर्म म्हणून संविधानिक मान्यता द्यावी.
२. लिंगायत सामाजाला अल्पसंख्यांक दर्जा द्यावा.
३. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम त्वरित सुरू करावे.
४. मुंबईत विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वराचा अश्वारूढ पुतळा उभारावा.
५. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
६. राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र रकाना करावा.
७. लिंगायत सामाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह बांधून द्यावे.
या मागण्यांसाठी आजपर्यंत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर २२ महामोर्चे झाले. मात्र, सरकारकडून या मागण्या मान्य ना झाल्यामुळे पुढील टप्पा म्हणून रविवारी आझाद मैदान, मुंबई येथे राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा होत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.