निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

येत्या विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान  काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने विदर्भातील अकराही जिल्ह्यांत जलदगती प्रतिसाद चमूची (quick response team) स्थापना करण्यात आली आहे.

Income Tax विभागाच्या सूचना

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापरावर प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेषण संचालयानाच्या सुविधांचा वापर करण्याचा सूचना दिल्या आहेत.

ज्यामुळे रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंच्या देवाण-घेवाणीवर आयकर विभाग बारीक लक्ष ठेवणार आहे.

याकरिता क्विक रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या असून हा चमू 24 तास कार्यरत राहणार आहेत.

शिवाय नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून टोल फ्री फोन क्रमांक, Whatsapp नंबर आणि फॅक्स नंबरदेखील उपलब्ध करून देण्यात आलेत.

या सुविधांचा वापर करून सजग नागरिक आयकर विभागाला निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाची सूचना देऊ शकतात.

मिळालेल्या सूचनेची शहानिशा करून आयकर विभाग पुढील कारवाई करणार असल्याचे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

सोबतच नागपूर व गोंदिया येथील विमानतळावर देखील विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीदरम्यान सहकारी बँकेतून 10 लाखाच्या वर रक्कम काढण्यात आली तर त्याची माहिती बँकेने स्वतःहून आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. सहकारी बँकांविषयी आयकर विभाग हे धोरण पहिल्यांदाच राबवणार आहे हे विशेष.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version