Mumbai Gujarat Railway Line : मुंबई गुजरात रेल्वे सेवा ठप्प, पावसाचे पाणी ट्रॅकवर; पश्चिम रेल्वे मार्गावरील 52 गाड्या रद्द

Mumbai Gujarat Railway Line : मुंबई गुजरात रेल्वे सेवा ठप्प, पावसाचे पाणी ट्रॅकवर; पश्चिम रेल्वे मार्गावरील 52 गाड्या रद्द

मुंबई : गुजरात आणि पालघर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी 52 गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर 46 गाड्यांचा प्रवास मध्येच थांबवावा लागला (शॉर्ट टर्मिनेशन) आणि 19 गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. या व्यत्ययामुळे मुंबई-सुरत-वलसाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि वांद्रे टर्मिनसवर प्रचंड गोंधळ उडाला. तिथे अडकलेल्या शेकडो प्रवाशांनी माहिती मिळवण्यासाठी तिकीट तपासणी आणि चौकशी कार्यालयांकडे धाव घेतली. अनेक प्रवाशांनी तक्रार केली की, स्थानकावर पोहोचण्यापूर्वी त्यांना गाड्या रद्द झाल्याबाबत, मार्ग बदलल्याबाबत किंवा उशिरा धावण्याबाबत कोणताही एसएमएस (SMS) किंवा अधिकृत सूचना मिळाली नव्हती.

घोलवड आणि उमरगाम रोड दरम्यानच्या पूल क्रमांक 203 वरील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने हा व्यत्यय सुरू झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेला रेल्वे वाहतूक थांबवावी लागली. पाण्याची पातळी ओसरल्यानंतर नंतरच्या काळात वेगावर निर्बंध घालून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरी दिवसभर सेवांवर मोठा परिणाम झाला. उपनगरीय रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. लोकल गाड्या केवळ वाणगावपर्यंतच चालवण्यात आल्या, तर डहाणू रोड लोकल सेवा दिवसभर बहुतांश काळ रद्द होत्या.

हेही वाचा : Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह कोकणात पुढील तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी; 5 जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट

वांद्रे टर्मिनसवर सर्वात वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. माहिती मिळवण्यासाठी व्याकुळ झालेले प्रवासी टीसी (TC) कार्यालय आणि चौकशी खिडक्यांसमोर मोठ्या रांगा लावून उभे होते. लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांसह अनेक कुटुंबे तासनतास वाट पाहत होती. तर स्पष्ट घोषणा आणि वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेक प्रवाशांनी सांगितले की, त्यांना ट्रेन रद्द झाल्याची माहिती स्टेशनवर पोहोचल्यानंतरच मिळाली. काहींनी सांगितले की, त्यांच्या गाड्यांची मार्ग-बदल (डायव्हर्जन) पूर्वसूचना न देताच वडोदरा येथून करण्यात आली. ज्यामुळे त्यांना नियोजित ठिकाणी पोहोचणे अशक्य झाले. काही प्रवाशांनी असाही दावा केला की, गाड्या रद्द करण्यापूर्वी त्या बोरिवली, डहाणू आणि इतर स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्सप्रेस, गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस, अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, फ्लाइंग राणी, वांद्रे टर्मिनस-सुरत इंटरसिटी, वापी पॅसेंजर, विरार-वलसाड पॅसेंजर आणि बोरिवली-वलसाड MEMU यासह अनेक प्रमुख गाड्या. उधना, पारडी आणि वलसाड येथे काही सेवा अल्पकालीन बंद करण्यात आल्या, तर खडकी-इंदूर विशेष लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी मार्गे वळवण्यात आल्या. "मी मुंबई सेंट्रलवरून जाणाऱ्या एका ट्रेनचे आरक्षण केले होते, पण सुटण्याच्या काही तास आधीच ती रद्द झाल्याचा संदेश मला मिळाला. त्यानंतर तिकिटे उपलब्ध असल्याने मी दुसऱ्या एका ट्रेनचे आरक्षण केले. मात्र, दोन तासांनंतर जेव्हा मी स्थानकावर पोहोचलो, तेव्हा ती ट्रेनही रद्द झाल्याचे मला सांगण्यात आले," असे वांद्रे टर्मिनसवर अडकून पडलेल्या अमित राय यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version