‘बारा महिने सभागृहाबाहेर पाठवू नका’ – अजित पवार

‘बारा महिने सभागृहाबाहेर पाठवू नका’ – अजित पवार

विधानभवानाच्या सभागृहात कुणी चुकले तर चार तास बाहेर ठेवा परंतु कुणालाही बारा महिने सभागृहाबाहेर ठेवू नका, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सदस्यांच्या वर्तनावर सभागृहाची प्रतिमा ठरत असते. मागील काही वर्षांमध्ये काही सदस्यांच्या वर्तवणुकीमुळे सभागृहाच्या मानसन्मानाला धक्का बसला आहे. सकाळच्या बैठकित सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते. तसेच विधिमंडळाच्या आवाराचे थेट प्रक्षेपण होत असताना सदस्यांनी वर्तन साजेसे ठेवले पाहिजे असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मतदार हे उमेदवाराकडे बघून मतदार करतात, आपण कुत्र्या, मांजरी या प्राण्यांचे नेतृत्व करत नाही, असा टोला लगावत अजित पवारांनी नितेश राणे यांचे कान टोचले.

विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

आज हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र आजही विरोधक आक्रमक असल्याचे दिसले आहेत. आजही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. या आंदोलनामध्ये भाजप आमदारांनी सहभाग घेतला. यावेळी विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातील ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांची फसवणूक या मुद्द्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version