मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा

गुढीपाडव्याचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन केले आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री असलम शेख उपस्थित होते. मुंबईतील या दोन्ही मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहेत.

मेट्रो २ अर्थात दहीसर पूर्व ते आरे कॉलनी पूर्व आणि मेट्रो ७ अर्थात डहाणूकरवाडी ते दहिसर पश्चिम मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मेट्रो मार्गिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

या मेट्रोच्या सहा बोगींच्या ११ मेट्रो गाड्यांच्या दिवसभरात १५० फेऱ्या धावणार आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेदरम्यान, दर ११ मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा नागरिकांसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असे आहेत मेट्रो मार्ग?

मेट्रो २ ए : दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसार, पहाडी एक्सर, कांदिवली, डहाणूकर वाडी

मेट्रो ७ :  आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरी पाडा, दहिसर पूर्व

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version