सावत्र वडिलांनी दीड वर्षाच्या मुलीला मारून टाकले

सावत्र वडिलांनी   दीड वर्षाच्या  मुलीला मारून टाकले

औरंगाबाद :  गंगापूर तालुक्यातील अंतापूर येथील एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन सावत्र वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलीला मारून टाकले आणि त्यानंतर तिचा मृतदेह मातीत पुरून दिला. आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपी पिता हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. जेवताना सतत रडते म्हणून सावत्र पित्याने मुलीचा खून केला. आरोपी पिता हा १४ वर्षीय असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी पिता हा अवघ्या 14 वर्षाचा आहे. त्याने एका 20 वर्षीय महिलेशी लग्न केले होते. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर त्याची बायको रागाच्या भरात तिथून निघून गेली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने मुलीला कडेवर घेऊन अंतापूर शिवारातील शेती महामंडळाचे शेत गाठले. तिथे नेऊन तिचा खून केला आणि मृतदेह तिथेच पुरून टाकला. सकाळी पश्चाताप झाल्यानंतर त्याने स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन मुलीचा खून केला असल्याचं पोलिसांना सांगितले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, नायब तहसीलदार अविनाश अंकुश, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, पोहेका योगेश हरणे, विजय भिल्ल, संजय मोरे, कैलास निभोंरकर यांनी २० मे रोजी दुपारी १२ वाजता घटनास्थळी जाऊन मृतदेह उकरुन काढला. चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच आरोपीविरुद्ध 302, 201 कलमांतर्गत गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version