Belapur-Uran Local Railway : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार 20 अतिरिक्त लोकल रेल्वे

बेलापूर - उरण रेल्वे मार्गावर आता अतिरिक्त लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहेत. यासाठी, मध्य रेल्वेने बेलापूर - उरण या रेल्वे मार्गावर 20 नवीन लोकल रेल्वे फेऱ्या सुरू करण्याची तयारी केली आहे.
Belapur-Uran Local Railway : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार 20 अतिरिक्त लोकल रेल्वे

नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बेलापूर – उरण रेल्वे मार्गावर आता अतिरिक्त लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहेत. यासाठी, मध्य रेल्वेने बेलापूर – उरण या रेल्वे मार्गावर 20 नवीन लोकल रेल्वे फेऱ्या सुरू करण्याची तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2025 पासून बेलापूर – उरण या रेल्वे मार्गावर 20 नवीन लोकल रेल्वे धावतील. 

सध्या सिवूड्स, बेलापूर-उरण या रेल्वे मार्गावर दर एका तासाने लोकल रेल्वे धावतात. मात्र, दुपारी जेव्हा गर्दी नसते, तेव्हा 90 मिनिटांनी लोकल रेल्वे धावतात. तसेच, या मार्गावरील प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे, 1-1 तासाने लोकल रेल्वे धावतात. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ थांबावा लागतो. सध्या, या रेल्वे मार्गावर 40 अप-डाउन फेऱ्या सुरू आहेत. मात्र, ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू झाल्यावर बेलापूर – उरण रेल्वे मार्गावर 10 अप आणि 10 डाउन अशा 20 अतिरिक्त लोकल रेल्वे धावतील. त्यामुळे, एकूण फेऱ्यांची संख्या 60 होणार आहे. 

हेही वाचा: Prasad Purohit : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर प्रसाद पुरोहित यांना कर्नलपदी बढती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. सोबतच, विमानतळाजवळ असलेल्या तरघर रेल्वे स्टेशनचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर, प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने हा विस्तार करण्यात येत आहे. रेल्वे फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. यापुढे, प्रवाशांना एक तास लोकल रेल्वे गाड्यांची पाट पाहावी लागणार नाही. अतिरिक्त गाड्या धावल्याने प्रवास सोयीस्कर होईल. सोबतच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी बेलापूर – उरण रेल्वे मार्ग हा सोपा आणि स्वस्त पर्याय ठरणार आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version