वर्सोव्यात सशस्त्र दरोडाच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

वर्सोव्यात सशस्त्र दरोडाच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दरोडेच्या तयारीत असलेल्या चौघा आरोपींना घातक शस्त्रांसह अटक केली असून एक आरोपी पसार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी विरोधात मोक्का अंतर्गत दाखल झाले असून याप्रकरणी त्यांना सात वर्षाची शिक्षा देखील झाली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विनोद किशोर वैष्णव (३८ वर्ष ), पिंटू कमलेश चौधरी (३२, वर्ष), अशफाक अब्दुल रशीद सयद (३३ वर्ष), चांद इब्राहीम शेख (२८ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तल, तीन राउंड, दोन मोटारसायकल असे एकूण १,५५,४००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शंकर चौरशिया (वडाळा) हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version